‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’मधील प्रथम दहा विजेत्यांचा होणार सन्मान

‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’मधील प्रथम दहा विजेत्यांचा होणार सन्मान • जलसंधारण दिनानामित्त आयोजित उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन • सहभागासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करणे गरजेचे लातूर, दि. २० : जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथे ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता लातूर जिल्हा परिषद प्रांगणातून या महा वॉकेथॉनला सुरुवात असून तीन किलोमीटर वॉकेथॉनमध्ये विजेत्या ठरणाऱ्या प्रथम दहा जणांचा वॉकेथॉनच्या समारोपप्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, युवक-युवती, खेळाडू, महिलांनी क्यूआर कोडद्वारे नोंदणी या वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण विभागाने या लोकचळवळीत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाची थीम ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युर टुमारो’ अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. प्रथम क्रमांकासाठी २५ हजाराचे बक्षीस; प्रत्येक सहभागीला ई-प्रमाणपत्र महा वॉकेथॉनमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यासोबतच ईश्वर चिठ्ठीद्वारे ७ सहभागींची निवड करून त्यांना प्रत्येकी ३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास