Posts

Showing posts from August, 2022

सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षीपासून शासनाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी

Image
 

लातूर जिल्ह्यात 1ते 10 सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत कोविड लसीकरण विशेष मोहिम, सर्व पात्र नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.*

  लातूर जिल्ह्यात 1ते 10 सप्टेंबर या   गणेशोत्सव कालावधीत कोविड लसीकरण विशेष मोहिम, सर्व पात्र नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा                                                         -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.* लातूर,दि.30(जिमाका)   गणेशोत्सव कालावधीत विशेष कोविड-19 लसीकरण मोहिमच्या निमित्ताने दिनांक 1 ते 10 सप्टेंबर या कालावधीत लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे, सर्व 12 वर्षावरील सर्व पात्र नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आवाहन केले आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव कालावधीत विशेष कोविड-19 लसीकरण मोहिम दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 10 सप्टेंबर, 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या कालावधीत 12 वर्षावरील सर्व पात्र लाभार्थी यां...

सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षीपासून शासनाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी

  सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षीपासून शासनाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेशमंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन पुरस्काराचे स्वरुप: एकूण 150 गुणांक तर प्रथम क्रमांक रुपये 5 लाख,व्दितीय क्रमांक रुपये 2 लाख 50 हजार व तृतीय क्रमांक रुपये 1 लाख गणेशोत्सव मंडळाने सदर अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि. 2 सप्टेंबर, 2022 पूर्वी ऑनलाईन पाठवावेत              लातूर,दि.30(जिमाका) महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. 26 ऑगस्ट, 2022 अन्वये दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत.             या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता...

गणेशोत्सव कालावधीत विशेष कोविड-19 1 ते 10 सप्टेंबर या कालावधीत लसीकरण मोहिम राबविणार

  गणेशोत्सव कालावधीत विशेष कोविड-19 1 ते 10 सप्टेंबर या कालावधीत लसीकरण मोहिम राबविणार     *लातूर,दि.30(जिमाका)*   जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. लातुर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात गणेशोत्सव कालावधीत विशेष कोविड-19 लसीकरण मोहिम दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 10 सप्टेंबर, 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या कालावधीत 12 वर्षावरील सर्व पात्र लाभार्थी यांना कोविड लसींचे डोस निशुल्क सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकिय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्रा.आ.केंद्र, उपकेंद्र व आवश्यकतेनुसार शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी दिले जाणार आहेत.   गणेशोत्सव कालावधीत विशेष कोविड-19 लसीकरण मोहिमच्या निमित्ताने 12 वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना 1 सप्टेंबर 2022 ते 10 सप्टेंबर 2022   या कालावधीत लस मोफत दिली जाणार आहे. तरी लसीकरणासाठी पात्र असलेल्या लाभार्थींनी नजीकच्या शासकीय दवाखान्यात संपर्क साधुन कोविड लसीचे सर्व डोस घ्यावेत...

गणेश चतुर्थीनिमित्त 31 ऑगस्ट व 6 सप्टेंबर 9 सप्टेंबर गणेश विसर्जनानिमित्त मद्यविक्री बंद

  गणेश चतुर्थीनिमित्त 31 ऑगस्ट व 6 सप्टेंबर   9 सप्टेंबर   गणेश विसर्जनानिमित्त   मद्यविक्री बंद   *लातूर,दि.29(जिमाका)* लातूर जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर,2022 या कालावधीत गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा होत असल्याने सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. लातूर यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 च्या कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक 31 ऑगस्ट, 2022 रोजी श्री गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण लातूर जिल्हा व दि. 6 सप्टेंबर, 2022 रोजी गणेश विसर्जनानिमित्त उदगीर नगरपरिषद हद्यीतील सर्व किरकोळ मद्यविक्री अबकारी अनुज्ञप्ती मद्यविक्रीस संपूर्णत:बंद राहतील असे आदेश जारी केले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधीत अनुज्ञप्तीवर निलंबीत अथवा रद्य करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही आदेशात नमूद केले आहे.                            ...

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव

  मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव कलाकारांना लोगो तयार करण्याचे आवाहन, सुबक लोगो करणाऱ्यास 25 हजार रुपयांचे पारितोषिक देवून जिल्हा प्रशासन गौरविणार           लातूर,दि.29(जिमाका)    मराठवाडा मुक्ती संग्रामाचे 17 सप्टेंबर, 2022 पासून अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत आहे. या अमृत महोत्सवाचे वर्षभर जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी लातूर जिल्हा केंद्रीत ठेवून मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव लोगो तयार करावयाचा आहे. जिल्ह्यातील कला क्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी, नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यंत सुबक, समर्पक असा लोगो तयार करुन देणाऱ्यास जिल्हा प्रशासनातर्फे बक्षिस रुपये 25 हजार रुपये देवून गौरविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले आहे. या लोगोमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम, लातूर जिल्ह्याचे वैशिष्टे आणि संस्कृतीचे दर्शन अभिप्रेत आहे.               हा लोगो दिनांक 10 सप्टेंबर, 2022 पर्यंत महेश परांडेकर, तहसीलदार...

सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षीपासून शासनाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी

  सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षीपासून शासनाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेशमंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आवाहन पुरस्काराचे स्वरुप: एकूण 150 गुणांक तर प्रथम क्रमांक रुपये 5 लाख,व्दितीय क्रमांक रुपये 2 लाख 50 हजार व तृतीय क्रमांक रुपये 1 लाख गणेशोत्सव मंडळाने सदर अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि. 30 ऑगस्ट, 2022 पूर्वी ऑनलाईन पाठवावेत          लातूर,दि.29(जिमाका) महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. 26 ऑगस्ट, 2022 अन्वये दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत.             या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. पूढील निकषाच्या ...

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या प्रोत्साहनाने लातूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगर पंचायती कचरा मुक्तीकडे...वेंगुर्ला पॅटर्न प्रमाणे हजारो टन कचरा विघटन सूरू

Image
  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या प्रोत्साहनाने लातूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगर पंचायती कचरा मुक्तीकडे...वेंगुर्ला पॅटर्न प्रमाणे हजारो टन कचरा विघटन सूरू   ▪ मराठवाडा मुक्ती दिनी सर्व नगर परिषद आणि नगर पंचायती होणार कचरा मुक्त ▪ प्लास्टिक वेगळं केल्यामुळे लवकर होणार कंपोस्ट तयार ▪ नगर परिषद प्रशासनाच्या सहआयुक्तांच्या पायाला भिंगरी, सकाळी 7 वाजल्यापासून   त्यांचा दिवस होतो सूरू   लातूर दि. 28 ( जिमाका )   लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, उदगीर, अहमदपूर नगर परिषदा, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर, जळकोट या नगर पंचायतीत जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार कचरा विघटन सुरु झाले असून नगर परिषद प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन विघटन प्रक्रिया कशी करावी याच्या प्रात्यक्षिकासह सांगितल्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श नमुना म्हणून लातूर जिल्ह्याची राज्यात ओळख होईल असा विश्वास रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे. कचरा वेगळा होतोय प्रशासनाच्या कचरा मुक्तीच्या चळवळीला आता लोकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असून घरातला सुका, ...

लातूर जिल्हा प्रशासनाकडून दयानंद महाविद्यालयामध्ये आयोजित रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद;1 हजार 448 युवकांची प्राथमिक निवड ,समुारे 3 हजार 350 युवकांचा सहभाग लातूर जिल्ह्याचा डि.एन.ए.नव निमिर्तीचा, जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल - *जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

Image
  लातूर जिल्हा प्रशासनाकडून दयानंद महाविद्यालयामध्ये आयोजित रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद;1 हजार 448 युवकांची प्राथमिक निवड ,समुारे 3 हजार 350 युवकांचा सहभाग   लातूर जिल्ह्याचा डि.एन.ए.नव निमिर्तीचा, जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल                                                         - *जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.   लातूर,दि.28(जिमाका):- भारताचे येणारे दशक हे कौशल्याधारित सेवा उद्योगाचे असणार आहे. युवकांनी अधिकाधिक कौशल्य आत्मसात करुन कष्टाची तयारी ठेवावी. श्रमाला कोणताही शॉर्टकट नसतो, हे लक्षात घेवून नवनव्या वाटा निर्माण करा. लातूरचा डि. एन. ए. नव निर्मितीचा आहे. जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शिक्षण व प्रशिक्षण का...

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत सोयाबीन मुल्यसाखळी विकास कार्यशाळा लातूर येथे संपन्न

  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत   "सोयाबीन मुल्यसाखळी विकास कार्यशाळा" लातूर येथे संपन्न   *लातूर,दि.26(जिमाका)-* महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत "सोयाबीन मुल्यसाखळी विकास कार्यशाळा" या विषयावर शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकऱ्यांना थेट लाभ व्हावा याकरिता नुकतेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वखार केंद्र लातूर ए-1 या ठिकाणी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेस नोडल अधिकारी Smart , म.रा.व.म पुणे अजित रेळेकर, विभागीय नोडल अधिकारी स्मार्ट लातूर राजेद्र कदम, बाजार माहिती विश्लेषक स्मार्ट प्रकल्प, पुणे, सचिन कदम, बाजार माहिती विश्लेषक स्मार्ट प्रकल्प अधिकारी अरंविद रिठे, संचालक, महाएफसी, लातूर, विशेष कार्य अधिकारी विलास उफाडे, म. ऊ सुर्यंवशी, उप-व्यवस्थापक अभियंता मुकुबल शेख, साठा अधिक्षक ए. जे. चव्हाण इत्यादी मार्गदर्शक उपस्थित होते.   के. आर. पवार विभागीय व्यवस्थापक महाराष्ट...

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सैनिक पाल्यांना एकरकमी रुपये 10 हजार व रुपये 25 हजार विशेष गौरव पुरस्कार

  विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सैनिक पाल्यांना एकरकमी रुपये 10 हजार व रुपये 25 हजार विशेष गौरव पुरस्कार   *लातूर,दि.26(जिमाका)-* लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय / आंतर राष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्यांना त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी एकरकमी रुपये 10 हजार व आंतर राष्ट्रीय स्तरासाठी रुपये 25 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्या बाबत सैनिक कल्याण विभाग, पुणे यांनी कळविले आहे. तसेच ज्या माजी सैनिक, विधवांचे पाल्य इयत्ता दहावी व बारावी मंडळाच्या परिक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवुण उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी पण गौरव पुरस्कारासाठी अर्ज दिनांक 15 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण ...

एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

  एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत   *लातूर,दि.26(जिमाका)* लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक विधवांच्या पाल्यामधून इ.दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी एक माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारसाठी अर्ज दि. 15 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे करावेत. एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारचे अर्ज सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी शिष्यवृत्ती योजना 2022-23

  माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी शिष्यवृत्ती योजना 2022-23   *लातूर,दि.26(जिमाका)* लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक / माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, ज्यांचे पाल्य सन 2021-22 मध्ये दहावी व बारावी मध्ये 60 टक्के गुण घेवून पास झाले आहेत व वैद्यकीय , अभियांत्रीकी, बी.एस.बी. ए. डिग्री कोर्सेस, बी.सी.ए., बी.बी.ए., बी फॉर्म, बी.एङ एल.एल.बी. व एम फॉर्म मध्ये शिक्षण धेत आहेत अशा माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्यांचे नवीन व जुनी शिष्यवृत्ती 2022-23 साठी अर्ज दिनांक 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय लातूर येथे कार्यालयीन वेळेत येऊन सादर करावेत. तसेच याबाबत फॉर्म व इतर माहिती कार्यालयात उपलब्ध्‍ करुन घ्यावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.                                  ...

गणेशोत्सव-2022 सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रत्येकी शंभर झाडांचे वृक्षारोपण करावे -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

  गणेशोत्सव-2022 सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रत्येकी शंभर झाडांचे वृक्षारोपण करावे                                    -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.           दरवर्षी परवानगी देतांना पुर्वी लावलेल्या किमान शंभर झाडांचे वृक्षारोपण व संगोपन केल्याचा पुरावा   लातूर,दि.25 (जिमाका):- लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे गणेशात्सव 2022 साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 31 ऑगस्ट, 2022 रोजी पासून गणेशोत्सव सुरु होणार आहे. श्रीगणेश स्थापनेची परवानगी पोलीस विभागाकडून दिली जाते. सदर गणेशोत्सव कालावधीमध्ये अनेक गणेशमंडळ समाज प्रबोधनाच्या विविध उपक्रमांचे (उदा. रक्तदान शिबीर, देखावे इत्यादी) आयोजित करतात. लातूर जिल्ह्यातील अत्यल्प वनक्षेत्र व नेहमीचे कमी प्रमाणातील पर्जन्यमान विचारात घेता जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याची नितांत गरज आहे. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मदतीने मोठय...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना”

  म हात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना ”   * लातूर,दि.25 (जिमाका):- * लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2022 अन्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजारांपर्यत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेस मान्यता दिलेली आहे. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार असुन या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे.योजना पुर्णत: ऑनलाईन पध्दतीने राबविली जाणार असून आधार क्रमांकानुसार यादया तयार करुन त्याचे लेखापरिक्षण करुन घेणार आहे.या   लेखापरिक्षण झालेल्या यादया महा-आयटीमार्फत विकसीत संगणकीय प्रणालीवर अपलोड करावयाच्या आहेत. या योजने अंतर्ग...

नव संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी इच्छुक नागरीकांनी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत सहभाग नोंदवावा

  नव संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी इच्छुक नागरीकांनी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत सहभाग नोंदवावा   * लातूर,दि.25(जिमाका):- * लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा तालुकास्तरीय प्रचार - प्रसिध्दी शुभारंभ दिनांक 17 ऑगस्ट रोजी झाला असून या यात्रेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी , नव उद्योजक व नागरीकांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.msins.in   वर नोंदणी करावी , तसेच जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा , असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती , लातूर यांनी केले आहे . राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत “ महाराष्ट्र राज्य नाविन्यतापूर्ण स्टार्ट अप धोरण 2018 ” जाहीर करण्यात आले आहे . या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे . या धोरणाच्या माध्यमातून राज्य...

सन 2020-21 व 2021-22 अंगर्तत महाविद्यालय स्तरावर प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत

  सन 2020-21 व 2021-22 अंगर्तत महाविद्यालय स्तरावर प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत            * लातूर,दि.24,(जिमाका):-* लातूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना या नोटीसीव्दारे अंतिम सूचना देण्यात येते की, भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिय्वृत्ती सन 2020-21 व सन 2021-22 अंतर्गत महाविद्यालय स्तरावर प्रलंबित नमूद वर्षातील शिष्यवृत्ती प्रस्ताव दि. 25 ऑगस्ट 2022 पर्यंत तात्काळ निकाली काढावेत. ज्या विद्यार्थींचे प्रस्तावामध्ये त्रुटी आहेत असे प्रस्ताव विद्यार्थी लॉगीनला परत करुन प्रलंबित प्रस्तावातील त्रुटी वेळेत पुर्ण करुन घ्यावी.             सदर बाबतीत केंद्र सरकारचे Pfms हे पोर्टल बंद करण्यात येत असून प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्तावामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालय व विद्यार्थ्यांची राहील याची गांर्भीयाने नोंद घ्यावी असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण एस.एन. चिकुर्ते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केल...