मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव
कलाकारांना
लोगो तयार करण्याचे आवाहन, सुबक लोगो करणाऱ्यास 25 हजार रुपयांचे पारितोषिक देवून जिल्हा
प्रशासन गौरविणार
लातूर,दि.29(जिमाका) मराठवाडा मुक्ती संग्रामाचे 17 सप्टेंबर, 2022
पासून अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत आहे. या अमृत महोत्सवाचे वर्षभर जिल्ह्यात विविध
कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी लातूर जिल्हा केंद्रीत ठेवून मराठवाडा मुक्ती संग्राम
अमृत महोत्सव लोगो तयार करावयाचा आहे. जिल्ह्यातील कला क्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी,
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यंत सुबक, समर्पक असा लोगो तयार करुन देणाऱ्यास
जिल्हा प्रशासनातर्फे बक्षिस रुपये 25 हजार रुपये देवून गौरविण्यात येणार असल्याचे
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले आहे. या लोगोमध्ये मराठवाडा मुक्ती
संग्राम, लातूर जिल्ह्याचे वैशिष्टे आणि संस्कृतीचे दर्शन अभिप्रेत आहे.
हा लोगो दिनांक 10 सप्टेंबर, 2022 पर्यंत
महेश परांडेकर, तहसीलदार (समान्य प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्याकडे
जमा करावा. हा लोगो आर्टपेपरवर पी.डी.एफ. स्वरुपात पेन ड्राईव्हमध्ये ( ओरिजन साईजमध्ये)
द्यावा लागेल, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment