जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून तीन दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिनानिमित्त चित्रप्रदर्शनाचे आयोजन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे झाले उदघाटन

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून तीन दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिनानिमित्त चित्रप्रदर्शनाचे आयोजन

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे झाले उदघाटन


लातूर, दि. 12 (जिमाका): भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी मोठया प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर झाले. त्यात अनेकांना आपले जीवनही गमवावे लागले. अनेकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्याच्या झळा पुढे अनेक वर्ष बसत राहिल्या. त्याच्या स्मृती आणि त्यांच्या प्रती असलेली सहवेदना आपल्या स्मरणात राहव्यात म्हणून देशभर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. लातूरच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात या "विभाजन विभाषिका स्मृती दिवस चित्र प्रदर्शनाचे " उदघाटन  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते करण्यात आले.

    


यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई आणि इतर मान्यवर. हे प्रदर्शन दिवसभर सर्वांसाठी खुले असणार आहे.


जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते वीरपत्नी मुद्रीका प्रकाश कांबळे, मीरा बाळासाहेब उतके, सविता शिवाजी पाटील, संगीता बालाजी माले यांचा गौरव करण्यात आला.

या प्रदर्शनात त्याकाळातले दुर्मिळ फोटो, त्यात गर्दीनेभरलेल्या रेल्वे, त्या काळातील या हिंसाचाराचे दैनिकात आलेल्या बातम्या हे सगळे आहे. आपल्या पूर्वजांनी हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किती मोठी किंमत मोजली आहे हे प्रदर्शन पाहुन आपल्याला कळेल.. आणि आजच्या स्वातंत्र्याचे मोलही कळेल त्यामुळे पुढचे तीन दिवस अधिकाधिक लोकांनी हे प्रदर्शन पाहावे असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. 








****


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा