जिल्हास्तर ज्युनियर व सब ज्युनियर नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धाचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजन

 

जिल्हास्तर ज्युनियर व सब ज्युनियर नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धाचे

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजन

 

            लातूर, दि.5(जिमाका):- राष्ट्रीय ज्युनियर व सब ज्युनियर नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा सन 2022 दि.2 सप्टेंबर ते 9 ऑक्टों 2022 या कालावधीत आयोजित होणार आहेत. तसेच राज्यस्तरीय नेहरू क्रीडा स्पर्धा ऑगस्ट 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत. त्यानूसार जिल्हा व विभागस्तर नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा चे आयोजन दि. 12 ऑगस्ट 2022 पूर्वी पूर्ण होईल असे आदेश आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले आहेत.

            त्यानुसार लातूर जिल्ह्याचा संघ विभागस्तरावरील स्पर्धेत पाठविण्यासाठी 15 वर्षे मुले (सब ज्युनियर), 17 वर्षे मुले (ज्युनियर) व 17 वर्षे मुली (ज्युनियर) या गटाच्या स्पर्धा दि. 10 ते 11 ऑगस्ट, 2022 या कालावधीत दयानंद विद्यालय, बाभळगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

            त्यासाठी हॉकी संघाच्या प्रवेशिका दि. 8 ऑगस्ट, 2022 सायंकाळी 6.00 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करण्यात यावे.

खेळाडूची पात्रता -15 वर्षे मुले (सब ज्युनियर) :- दि. 01 नोव्हेंबर 2007 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.17 वर्षे मुले (ज्युनियर):- दि. 01 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 17 वर्षे मुली (ज्युनियर):- दि. 01 नोव्हेंबर 2005 किंवा त्यांनतर जन्मलेले असावेत.

            सदर स्पर्धेच्या प्रवेशिका विहीत मुदतीत ओळखपत्रासह सादर करावेत. अन्यथा उशिरा प्रवेशिका सादर केलेल्या संघांना सदर स्पर्धेत सहभाग नोंदवता येणार नाही. तरी खेळाडू, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक यांनी नोंद घेऊन जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  जगन्नाथ लकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

        अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी मदनलाल गायकवाड, यांच्याशी संपर्क साधावा मो.नं - 8208235258

 

                                      000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा