गणेश चतुर्थीनिमित्त 31 ऑगस्ट व 6 सप्टेंबर 9 सप्टेंबर गणेश विसर्जनानिमित्त मद्यविक्री बंद
गणेश चतुर्थीनिमित्त
31 ऑगस्ट व 6 सप्टेंबर 9 सप्टेंबर
गणेश विसर्जनानिमित्त मद्यविक्री बंद
*लातूर,दि.29(जिमाका)* लातूर जिल्ह्यात
दिनांक 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर,2022 या कालावधीत गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात
साजरा होत असल्याने सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी. लातूर यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 च्या कलम 142 (1) अन्वये
प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक 31 ऑगस्ट, 2022 रोजी श्री गणेश चतुर्थीनिमित्त
संपूर्ण लातूर जिल्हा व दि. 6 सप्टेंबर, 2022 रोजी गणेश विसर्जनानिमित्त उदगीर नगरपरिषद
हद्यीतील सर्व किरकोळ मद्यविक्री अबकारी अनुज्ञप्ती मद्यविक्रीस संपूर्णत:बंद राहतील
असे आदेश जारी केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधीत अनुज्ञप्तीवर
निलंबीत अथवा रद्य करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही आदेशात नमूद
केले आहे.
000
Comments
Post a Comment