खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी स्पर्धा इच्छुक शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

 

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी स्पर्धा

इच्छुक शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

                                               *-जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी*

             *लातूर,दि.24,(जिमाका):-* रब्बी हंगामात घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता खरीप 2022 हंगामातही शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी(रागी), तूर, सोयाबीन, भूईमुग ब सुर्यफुल इ.  पिकांसाठी 31 ऑगस्टपूर्वी इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करता येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

           राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात आणि उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

          यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येते. खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशा अकरा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे व अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु