१४ ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन

 

१४ ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिनानिमित्त

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन

 

लातूर दि.12 (जिमाका) :-  देशाला सन १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. याच्या अगोदर फाळणीमुळे अनेक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले, अनेकांना प्राण गमवावे लागले, अनेकांवर अत्याचार झाले. फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेल्या बलिदानाचे, सहन केलेल्या अत्याचार,  दु:ख, वेदना, संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिन म्हणून पाळण्यात येत असून त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन भरविले जात असल्याची माहिती  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

   फाळणी अत्याचार स्मृती दिवस या दिनी देशाच्या फाळणीत बळी पडलेल्या लाखो लोकांवर झालेले अत्याचार, त्यांच्या वेदना तसेच विस्थापित झालेल्या लोकांचे दु:ख लोकांसमोर मांडले जावे ही या मागची संकल्पना आहे. याचे प्रदर्शन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्या मजल्यावर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 पासून आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

00000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा