एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत
एअर मार्शल
व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी
15 सप्टेंबर
पर्यंत अर्ज सादर करावेत
*लातूर,दि.26(जिमाका)*
लातूर
जिल्ह्यातील माजी सैनिक विधवांच्या पाल्यामधून इ.दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत
सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी एक माजी सैनिकांच्या विधवांच्या
पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारसाठी अर्ज दि. 15 सप्टेंबर
2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे करावेत. एअर मार्शल व्ही.ए.
पाटकर विशेष गौरव पुरस्कारचे अर्ज सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडे 30 सप्टेंबर
2022 पर्यंत सादर करावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Comments
Post a Comment