निवड झालेल्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे पुरवठा करण्यासाठी इच्छुक पुरवठाधारकांने अर्ज करावेत
निवड झालेल्या लाभार्थ्यांना दुधाळ
जनावरे
पुरवठा करण्यासाठी इच्छुक पुरवठाधारकांने
अर्ज करावेत
*लातूर,दि.24,(जिमाका):-* सन 2022-23 या पुरवठा वर्षाकरीता विशेष घटक व नाविण्यपुर्ण
योजना व इतर योजनेअंर्गत निवड झालेल्या लाभार्थींना दुधाळ जनावरे (गाई / म्हैशीचा)
पुरवठा करण्यासाठी लातूर जिल्ह्यात पुरवठा धारकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी
इच्छुक पुरवठा धारकाने जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त लातूर या कार्यालयात दिनांक 24 ऑगस्ट,
2022 ते 8 सप्टेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा
पशुसंवर्धन उपआयुक्त लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
सदरील योजनेच्या अटी व शर्ती जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त लातूर यांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे असेही पत्रकात
नमुद केले आहे.
Comments
Post a Comment