अहमदपूर तालुक्यातील मेथी येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल येत्या 19 सप्टेंबर रोजी

 

अहमदपूर तालुक्यातील मेथी येथील ग्रामपंचायत

सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल येत्या 19 सप्टेंबर रोजी

 

              लातूर,दि.17,(जिमाका):- मा. राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र यांचे पत्र दि.12 ऑगस्ट 2022 पत्रान्‍वये मा.राज्‍य निवडणूक आयोग यांनी माहे जानेवारी २०२१- मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्‍या व जुन २०२२ ते सप्‍टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्‍या तसेच नव्‍याने स्‍थापीत ग्रामपंचायतीच्‍या (सदस्‍य पदासह थेट सरपंच पदाच्‍या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्‍याचा प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रम दिलेला आहे.

          त्‍यामध्‍ये लातूर जिल्‍हयातील अहमदपूर तालुक्‍यातील निवडणुका असलेल्‍या मेथी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तालुका अहमदपूर ग्रा.प.चे नाव मेथी.

मा.राज्‍य निवडणूक आयोगाने दिलेल्‍या निर्देशानुसार निवडणुकीची सूचना ही गुरूवार दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी संबंधीत तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्‍या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे. आवश्‍यक असल्‍यास मतदानाचा रविवार दिनांक 18 सप्टेंबर वेळ सकाळी 7.30 वा. पासून ते सायं. 05.30 पर्यंत व मतमोजणीचा सोमवार दिनांक 19 सप्टेंबर 2022 असा आहे. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश महाडिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                             000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु