लातूर मध्ये ऐतिहासिक अमृत महोत्सवी "समुह राष्ट्रगीत"
लातूर मध्ये ऐतिहासिक अमृत महोत्सवी "समुह
राष्ट्रगीत"
लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 1900
विद्यार्थ्यांनी देशाचा नकाशा, तिरंगा, अमृत महोत्सव हे दर्शवून "सामुहिक
राष्ट्रगीत" गायले
▪️ जिल्हा क्रीडा संकुलाचे सगळे वातावरण चैतन्याने
बहरून गेले....!!
लातूर,
दि. 17 (जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लातूर जिल्ह्यात अत्यंत उत्साहात 8
ऑगस्ट पासून विविध कार्यक्रमांनी साजरा केला. आज 17 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा
संकुलात हे ऐतिहासिक असे "सामुहिक राष्ट्रगीत " प्रत्येक भरतीयाला
अभिमान वाटेल अशी देशाच्या नकाशाची, तिरंगा आणि अमृत महोत्सव दर्शविणारी प्रतिकृती
देशीकेंद्र विद्यालय आणि गोदावरी कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली. जिल्हा
प्रशासनाने आयोजित केलेल्या या सामुहिक राष्ट्रगीत कार्यक्रमाला या मुळे ऐतिहासिक
महत्व प्राप्त झाले. मी सर्वांचे आभार व्यक्त अशी कृतज्ञता जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी. पी. यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्ह्यात अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा मोहिम राबविली त्यात आपण
आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावलेले होते. ते ध्वज काढल्यानंतर त्या ध्वजाचा अवमान
होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. तसेच राष्ट्रध्वज आपल्या घरी
सन्मानाने आणि सुरक्षित ठेवावा. झेंडा खराब झाला, फाटला असेल किंवा जतन करायला
अडचण असेल तर तो सन्मानपूर्वक विक्री केंद्राच्या
ठिकाणी द्यावा. आम्ही शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सन्मानपूर्वक ते झेंडे
ठेवू असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी. पी. यांनी केले आहे.
या सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमास
जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच देशिकेंद्र विद्यालय, गोदावरी कन्या विद्यालय
येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर
जिल्ह्यात विविध कार्यक्रम यशस्वी केले, त्यात घरोघरी तिरंगा, प्रदर्शन,
ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा कार्यक्रम घेतले आहेत. फाळणीच्या आठवणीवर जिल्हाधिकारी
कार्यालयात विभाजन विभाषिका स्मृती दिवस चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले. या सर्व
कार्यक्रमाची नोंद शासनाने घेतलेली आहे.
यासाठी
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी
अधिकारी दत्तात्रय गिरी, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी हा कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी प्रयत्न केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
यांनी यावेळी केला.
या
समुह राष्ट्रगीत कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अप्पर पोलीस
उपाअधीक्षक अनुराग जैन, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी
सदाशिव पडदुणे आदि जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी,
शिक्षक जिल्ह्यातील विविध शाळेचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment