राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 लातूर जिल्ह्यात 5 हजार 640 विद्यार्थी परीक्षा देणार, शहरात 13 उपकेंद्रावर होणार परीक्षा, 400 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
*राज्यसेवा पूर्व
परीक्षा-2022*
*लातूर जिल्ह्यात 5 हजार 640 विद्यार्थी परीक्षा देणार *
*शहरात 13 उपकेंद्रावर
होणार परीक्षा, 400 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती*
*लातूर,दि.19
(जिमाका):-* जिल्ह्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 जिल्ह्यातील 13 उपकेंद्रावर
होणार असून या परीक्षेसाठी 5 हजार 640 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी
400 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022
ही परीक्षा रविवार, दिनांक 21 ऑगस्ट, 2022 रोजी या दोन सत्रामध्ये होणार आहे, असे निवासी
उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राजर्षी शाहू विज्ञान, कला महाविद्यालय, बसस्थानकासमोर,
लातूर येथे परीक्षार्थी संख्या -480, श्री देशिकेंद्र विद्यालय, सिंग्नल कँम्प, लातूर
येथे परीक्षार्थी संख्या -480, यशवंत विद्यालय, लातूर येथे परीक्षार्थी संख्या
-480, जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड लातूर येथे परीक्षार्थी संख्या 480, सरस्वती
विद्यालय खाडगांव रोड प्रकाश नगर लातूर येथे परीक्षार्थी संख्या -480, श्री शिवाजी
उच्च माध्यमिक विद्यालय ( सायन्स), सरस्वती कॉलनी, लातूर येथे परीक्षार्थी संख्या
-480, श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालय दयाराम रोड लातूर येथे परीक्षार्थी संख्या
-456, ज्ञानेश्वर विद्यालय शाहू चौक नांदेड रोड लातूर येथे परीक्षार्थी संख्या
-384, दयानंद विज्ञान महाविद्यालय बार्शी रोड लातूर येथे परीक्षार्थी संख्या -384,
श्री व्यंकटेश विद्यालय झिंगणअप्पा गल्ली अग्रसेन भवन जवळ लातूर येथे परीक्षार्थी संख्या-
384, श्री सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय खाडगांव रोड लातूर येथे परीक्षार्थी संख्या
-384, श्री मारवाडी राजस्थान विद्यालय सिंग्नल कँम्प लातूर येथे परीक्षार्थी संख्या
-288, श्री केशवराज विद्यालय शाम नगर लातूर येथे परीक्षार्थी संख्या – 480 असे एकूण
5 हजार 640 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रत्येक केंद्रावर बंदोबस्तासाठी पोलीस
लावण्यात आल्याची माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दिली आहे.
*****
Comments
Post a Comment