जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम कार्डच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल वर जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करावी

 

जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम कार्डच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल वर जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करावी

सर्व कामगारांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर वर जाऊन नोंदणी करावी

लातूर,दि.3(जिमाका):- जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम कार्डच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल वर जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करून लाभ घेण्यासाठी दि. 3 व 4 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. लातुर जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रात काम करणा-या सर्व कामगारांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) वर जाऊन नोंदणी करावी.

नोंदणीस कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून नोंदणी विनामूल्य आहे. लातुर जिल्ह्यासाठी 10 लाख 60,049 एवढे उद्दीष्ट दिलेले असून त्यापैकी 2 लाख 36 हजार 343 असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली असून उर्वरित असंघटित क्षेत्रात काम करणा-या कामगारांनी मोठ्याप्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.

लातुर जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगारांनी विशेष नोंदणी अभियाना अंतर्गत ई श्रम कार्डसाठी जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) वर जाऊन ई श्रम पोर्टल वर नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश रा. झोले, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

आधार कार्ड, बँक पासबुक व सक्रिय मोबाईल क्रमांक (आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक) नोंदणीसाठी कागदपत्रे आवश्यक आहे.

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु