येत्या 13 ऑगस्ट रोजी पासून जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
येत्या 13 ऑगस्ट रोजी पासून
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे
आवाहन
लातूर,दि.11(जिमाका)- आत्मा अंतर्गत रानभाज्यांचे
महत्व प्रसारीत करण्या करिता व विपणन साखळी निर्माण करण्याकरिता सन 2022-23 मध्ये
रानभाजी महोत्सव दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी कल्पतरु मंगल कार्यालय, औसा रोड लातूर
येथे या कालावधीमध्ये सकाळी 10 ते 5 या कालावधीमध्ये रानभाजी महोत्सव आयोजित
करण्यात येणार आहे.
सदर महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी.पी. व इतर मान्यवरांचे हस्ते होणार असून तालूकास्तरावर दि. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट
2022 या कालावधीमध्ये होणार आहे. या महोत्सवामध्ये रानभाज्या व रानफळांची
वैशिष्ये, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पध्दती,भाजीची पाककृती (रेसिपी)
याची सचित्र माहिती, रानभाज्यांची तांत्रिक माहिती व पाककृती यांची माहिती देण्यात
येणार असून सदर रानभाज्या व फळे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
तरी दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी कल्पतरु मंगल कार्यालय,
औसा रोड लातूर येथे आयोजित असून जिल्ह्यातील सर्व शेतकरी ज्यांच्याकडे रानभाज्या व
रानफळे उपलब्ध आहेत अशांनी विक्रीसाठी घेवून यावे. आपणांस विक्री व्यवस्थापन सोय
करण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व इतर
नागरीकांनी सदर महोत्सवामध्ये सहभाग नोंदवून रानभाज्यांची माहिती घेवून खरेदी
करण्याचे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा डि. एस. गावसाने यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे केले आहे.
00
Comments
Post a Comment