जी. डी. सी. अँड ए. व सी. एच. एम. परीक्षा 2020 गुणपत्रके व प्रमाणपत्रे उपनिबंधक कार्यालयाकडे उपलब्ध्
जी.
डी. सी. अँड ए. व सी. एच. एम. परीक्षा 2020
गुणपत्रके
व प्रमाणपत्रे उपनिबंधक कार्यालयाकडे उपलब्ध्
लातूर, दि. 10 (जिमाका):- माहे ऑक्टोंबर - 2021 मध्ये
झालेल्या जी. डी. सी. अँड ए. व सी. एच. एम. परीक्षा 2020 चा निकाल यापूर्वीच प्रसिद्ध
केलेला आहे. या परीक्षेला बसलेल्या सर्व परिक्षार्थ्यांची गुणपत्रके व प्रमाणपत्रे
परिक्षार्थ्यांना वितरित करण्यासाठी संबंधित
केंद्राचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे देण्यात आलेले आहेत.
परिक्षार्थींनी
एका महिन्याच्या कालावधीत त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र संबंधित केंद्रावरून स्वत: घेऊन जावे. तपशिलासाठी इतर https://sahakarayukta.maharashtra.gov.in मधील “महत्वाचे
दुवे मधील जी. डी. सी. ॲण्ड ए. मंडळ” या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे पुणे जी.
डी. सी. ॲण्ड ए. बोर्ड तथा उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण), सहकारी संस्था सचिव महेंद्र मगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले
आहे.
000
Comments
Post a Comment