स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आज मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन लातूर शहरातील / जिल्ह्यातील खेळाडू, नागरिक व कर्मचारी यांनी मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे - जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे
आज मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
लातूर शहरातील / जिल्ह्यातील खेळाडू, नागरिक व कर्मचारी यांनी
मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे - जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

लातूर,दि.11(जिमाका)-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत हर घर झेंडा हा उपक्रम हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे केले जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल परिसरात नागरिकांसाठी सेल्फी स्टँड उभे करण्यात आलेले आहे. तसेच योगा, सुर्य नमस्कार यांचेही योगाभ्यास आयोजित केलेले आहे.

या कार्यक्रमा सोबतच लातूर शहरात खेळाडू, नागरिकांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष बी.पी.पृथ्वीराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यात 14 वर्षाखालील मुले / मुली यांचा गट 3 कि.मी., 17 वर्षाखालील मुले / मुली 5 कि.मी व त्यापुढील वयाचा खुला गट 10 कि.मी. ठेवण्यात आलेला आहे.
या मॅरेथॉनमध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल व प्रशस्तीपत्रक बहाल करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे सुरूवात ही दि. 13 ऑगस्ट, 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथून सकाळी ठिक 6-30 वाजता सुरू होणार आहे.

स्पर्धेचा मार्ग उपस्थित ठिकाणी सांगण्यात येईल तसेच या प्रसंगी जिम्नॅस्टीक, एरोबिक्स यांचे प्रात्याक्षिक जिल्हा क्रीडा संकुल येथे दाखविण्यात येणार आहेत. तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहेत. तरी लातूर शहरातील / जिल्ह्यातील खेळाडू, नागरिक व कर्मचारी यांनी सदरील कार्यक्रमांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागी होऊन सहकार्य करावे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची नोंदणी हि दि. 12 ऑगस्ट, 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 9-45 पासून करण्यात येईल.

तरी सर्व नागरिक, खेळाडूंनी यांची नोंद घेऊन सदर उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी मदनलाल गायकवाड मो.नं. 8208235258 यांच्याशी संपर्क साधावा.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा