केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत
केंद्र
शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी
ऑनलाईन अर्ज सादर करावेत
-जिल्हा समाज
कल्याण अधिकारी यांचे आवाहन
लातूर,दि.3(जिमाका):- आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, म.रा.पुणे यांनी दिलेल्या
निर्देशानुसार भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलिीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती
सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती, शालांत
परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च
श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येतात. पात्र दिव्यांग
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarship.gov.in)
ऑनलाईन अर्ज सादर करणे आहे.
सन
2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पोर्टलवर अर्ज सादर करणेसाठी मुदत पूढील प्रमाणे देण्यात
आलेली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती विद्यार्थी
नोंदणी. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत. सदोष अर्ज पडताळणी तारीख
16 ऑक्टोबर 2022 पर्यंत संस्था पडताळणी 16
ऑक्टोबर 2022 पर्यंत.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती विद्यार्थी नोंदणी 31ऑक्टोबर 2022 पर्यंत. सदोष अर्ज पडताळणी तारीख 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत संस्था पडताळणी 15
नोव्हेंबर 2022 पर्यंत.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती विद्यार्थी नोंदणी 31 ऑक्टोबर 2022
पर्यंत सदोष अर्ज पडताळणी तारीख 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत
संस्था पडताळणी 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत.
वरीलप्रमाणे
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी
अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे केले आहे.
0000
Comments
Post a Comment