बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत सोयाबीन मुल्यसाखळी विकास कार्यशाळा लातूर येथे संपन्न

 

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत

 "सोयाबीन मुल्यसाखळी विकास कार्यशाळा" लातूर येथे संपन्न

 

*लातूर,दि.26(जिमाका)-* महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत "सोयाबीन मुल्यसाखळी विकास कार्यशाळा" या विषयावर शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकऱ्यांना थेट लाभ व्हावा याकरिता नुकतेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वखार केंद्र लातूर ए-1 या ठिकाणी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.

या कार्यशाळेस नोडल अधिकारी Smart, म.रा.व.म पुणे अजित रेळेकर, विभागीय नोडल अधिकारी स्मार्ट लातूर राजेद्र कदम, बाजार माहिती विश्लेषक स्मार्ट प्रकल्प, पुणे, सचिन कदम, बाजार माहिती विश्लेषक स्मार्ट प्रकल्प अधिकारी अरंविद रिठे, संचालक, महाएफसी, लातूर, विशेष कार्य अधिकारी विलास उफाडे, म. ऊ सुर्यंवशी, उप-व्यवस्थापक अभियंता मुकुबल शेख, साठा अधिक्षक ए. जे. चव्हाण इत्यादी मार्गदर्शक उपस्थित होते.

 के. आर. पवार विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, लातूर यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकऱ्याचे स्वागत करुन शेतकरी उत्पादक कंपन्याना महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सवलतीची व सुविधाची माहिती देण्यात आली.

वखार महामंडळाकडून स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी व इतर ठेविदारासाठी लातूर येथे 10 हजार मे. टन साठवणूक क्षमतेचे सायलो गोदाम, महामंडळाच्या गोदामात साठवणूक जागेचे आरक्षण, साठवणूक भाडयामध्ये 25 टक्के सवलत व साठवणूक करण्यात आलेल्या शेतमालावर ७५ लाखापर्यंत (Block Chain) ब्लॉक चेन व्दारे तारण कर्ज व महामंडळाच्या विविध सोयी सुविधाची माहिती श्री. रेळेकर यांनी दिली.

सोयाबीन मुल्यसाखळीमध्ये सोयाबीन बियाणे, खते किटकनाशक इत्यादीकरिता होणार खर्च कमी झाला पाहिजे व सोयाबीन प्रक्रिया क्रुडआईल उत्पादन उद्योगामध्ये शेतकरी उद्योगामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यानी उतरावे व कंपनीचे सभासद व कंपनीचा अधिका- अधिक लाभ होण्यासाठी फायदा करुन घेण्यात यावे राजेद्र कदम यांनी नमुद केले.

सोयाबीन काढणी पश्चात शेतकरी उत्पादक कंपन्यानी अंतराराष्ट्रीय बाजारमधील दराची माहिती घेऊन सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस इत्यादी नगदी पीकाची साठवणूक करुन भाव वाढीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले. तसेच सोयाबीन ची (NCDX) एनसीडीएक्स व्दारे विक्री करावी. याबाबत सचिन कदम व अरंविद रिठे स्मार्ट प्रकल्प यांनी मार्गदर्शन करण्यात आले.‍ कार्याशाळे समारोप  एस. एन झालटे यांनी केले.

 

                                             0000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु