स्वराज्य महोत्सव उपक्रमातंर्गत येत्या 17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सगळीकडे एकाच वेळी सकाळी 11-00 वाजता होणार समुह 'राष्ट्रगीत'

 

स्वराज्य महोत्सव उपक्रमातंर्गत येत्या 17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सगळीकडे एकाच वेळी सकाळी 11-00 वाजता होणार समुह 'राष्ट्रगीत'

 

लातूर,दि.11(जिमाका):-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले असून 8 ते 17 ऑगस्ट, 2022 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व स्तरातून दिनांक 17 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11-00 वाजता शाळा, महाविद्यालय, संस्था, नागरिक यांच्या सहभागाने समुह राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणानी सर्वांपर्यंत ही माहिती पोहचवावी असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी सांगितले. यासोबतच 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शन भरवायची असून त्यात स्वातंत्र्य काळातील घटना, त्याची माहिती त्यात अभिप्रेत आहे. दिनांक 15 ऑगस्ट, 2022 रोजी झेंडा वंदन झाल्या नंतर सामूहिकरित्या तंबाखु मुक्तीची शपथ घ्यावयाची आहे.

 आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सव-2022 च्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाची बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) चे दत्तात्रय गिरी आदी विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.  

 

                                          



 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा