माजी सैनिक / विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी शिष्यवृत्ती योजना 2022-23
माजी सैनिक
/ विधवांच्या पाल्यांना कल्याणकारी
शिष्यवृत्ती
योजना 2022-23
*लातूर,दि.26(जिमाका)* लातूर जिल्ह्यातील
माजी सैनिक / माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, ज्यांचे पाल्य
सन 2021-22 मध्ये दहावी व बारावी मध्ये 60 टक्के गुण घेवून पास झाले आहेत व वैद्यकीय
, अभियांत्रीकी, बी.एस.बी. ए. डिग्री कोर्सेस, बी.सी.ए., बी.बी.ए., बी फॉर्म, बी.एङ
एल.एल.बी. व एम फॉर्म मध्ये शिक्षण धेत आहेत अशा माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्यांचे
नवीन व जुनी शिष्यवृत्ती 2022-23 साठी अर्ज दिनांक 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालय लातूर येथे कार्यालयीन वेळेत येऊन सादर करावेत.
तसेच याबाबत फॉर्म व इतर माहिती कार्यालयात
उपलब्ध् करुन घ्यावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000
Comments
Post a Comment