मागासवर्गीयांसाठी 20 टक्के सेस आणि दिव्यांगासाठी 5 टक्के सेस या योजनेतंर्गत अर्ज करावेत

                                 मागासवर्गीयांसाठी 20 टक्के सेस आणि दिव्यांगासाठी

5 टक्के सेस या योजनेतंर्गत अर्ज करावेत

          *लातूर,दि.2(जिमाका):-* समाज कल्याण विभाग जि.प. लातूर यांच्यामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षात मागासवर्गीयांसाठी 20 टक्के सेस आणि दिव्यांगासाठी 5 टक्के सेस या योजनेअंतर्गत खालील योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

            या योजनेच्या अर्जाचे नमुने सर्व  पंचायत समिती  स्तरावर उपलब्ध आहेत.  तरी खालील योजनांचा लाभ घेण्यात यावा.असे अवाहन  प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. लातूर यांनी केलेले आहे.

       20 टक्के मध्ये मागासवर्गीय महिलांसाठी मिरची कांडप यंत्र, मागासवर्गीय मुलींना सायकल पुरवठा करणे, मागासवर्गीय महिलांना मिनी पिठाची गिरणी पुरवठा करणे, मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशिन पुरवठा करणे, मागासवर्गीय व्यक्तींना लघुउद्योगासाठी शेळीपालन, नरेगातून विहिरी पूर्ण केलेल्या मागासवर्गीय व्यक्तींना 5 HP पाणबुडी वाटप करणे. त्यासोबत दिव्यांग  5 टक्के  योजनेसाठी दिव्यांगाना  व्हेंडींग स्टॉल, दिव्यांगासाठी घरकुल देण्याची योजना, दिव्यांग भुमीहीन शेतमजुरासाठी  शेळीपालन  अतितीव्र 80 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग लाभार्थ्याच्या पालकांना निर्वाह भत्ता  देणे. अशा सर्व योजनांचे अर्ज  माहिती पत्रकासह सर्व पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत. अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रासह दि. 14 ऑगस्ट 2022 पर्यंत संबधित योजनाचे अर्ज  पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे. असे अति. मु.का.अ. प्रभु जाधव व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी माहिती दिली.

            सदर योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची समस्या उदभवल्यास समाज कल्याण विभाग जि. प. लातूर  (0238255092) या नंबर वर संपर्क साधावा. त्याचबरोबर सदर योजनेची माहिती जिल्हा परिषद, लातूर यांच्या www.zplatur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

                                                                000                                              

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु