व्यायामशाळा विकास अनुदान योजना व क्रीडांगण विकास अनुदान योजना ( सर्वसाधारण व अनुसुचित जाती उपयोजना / अदिवासी योजना ) प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
व्यायामशाळा विकास अनुदान
योजना व क्रीडांगण विकास अनुदान योजना ( सर्वसाधारण व अनुसुचित जाती उपयोजना /
अदिवासी योजना ) प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
लातूर,दि.5(जिमाका):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
विभागातंर्गत शासन निर्णय शालेय व शिक्षण व क्रीडा विभाग क्रं.क्रीडाधो-संकीर्ण/प्र.क्र.49/क्रीयुसे-1,
दिनांक 08 जानेवारी 2019, अन्वये व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येत
असून त्याची अनुदान मर्यादा कमाल 7.00 लाख इतकी करण्यात आलेली आहे.
जिल्हा
नियोजन समिती, लातूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कार्यान्वीय
यंत्रणेद्वारे उपरोक्त शासन निर्णयांचा अधीन राहून व्यायामशाळा विकास अनुदान योजने
अंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक
शाळा, शासकीय विभाग, अदिवासी व समाज कल्याण विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज्य संस्था,
ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांना खुली व्यायामशाळा साहित्य व
व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी रू.7.00 लाख मर्यादेत व्यायाम साहित्याचा पुरवठा
करण्याचे प्रस्तावित करण्यात येते.
अनुसुचित
जाती उपयोजनेतंर्गत ज्या गावांत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये
व्यायामशाळा उपलब्ध असेल तेथे व्यायामसाहित्य उपलब्ध करून देण्यात येईल तसेच दलित
वस्ती किंवा वस्तीच्या नजीकच्या परिसरात सुयोग्य मोकळी जागा उपलब्ध असेल तर खुले
व्यायामशाळा साहित्य ( Open Gym ) उपलब्ध करून देण्यात येईल व त्याबाबत ग्रामपंचायतीचा
दलित वस्तीमध्येच व्यायाम साहित्य बसवणेबाबतचा ठराव जोडावा लागेल.
अदिवासी
उपयोजनेतंर्गत अदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायती व अदिवासी शाळा तसेच अदिवासी क्षेत्रालगत (OTSP)
ग्रामपंचायती व शाळांना व्यायामसाहित्य, खुली व्यायामशाळा साहित्य व क्रीडा
साहित्य पुरवठा करण्यात येतो.
क्रीडांगण
विकास अनुदान योजनेतंर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा
व ग्रामपंचायत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग, अदिवासी व
समाज कल्याण विभागतंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज संस्था, ग्रामपंचायत,
नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका अंतर्गत रू.3.00 लाख मर्यादेत विविध खेळांचे
क्रीडा साहित्य पुरवठा करण्याचे प्रस्तावित करण्यात येते.
तरी
स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व पात्र
विभागांनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा
क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर येथे उपलब्ध विहीत नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव
दि.31 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ
लकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
अधिक
माहितीसाठी क्रीडा अधिकारी मदनलाल गायकवाड व क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांच्याशी संपर्क साधावा. मो.नं. 8208235258,
9975576600
0000
Comments
Post a Comment