जिल्ह्यात गोपाळकाला, दिपावली व दर्शवेळा अमावस्याच्या स्थानिक सुट्या जाहीर

 

जिल्ह्यात गोपाळकाला, दिपावली व दर्शवेळा

 अमावस्याच्या स्थानिक सुट्या जाहीर

          लातूर,दि.18(जिमाका):-जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शुक्रवार, दिनांक 19 ऑगस्ट, 2022 रोजी गोपाळकाला, मंगळवार, दिनांक 25 ऑक्टोबर, 2022 रोजी दिपावली तर शुक्रवार, दिनांक 23 डिसेंबर, 2022 रोजीच्या दर्शवेळा अमावस्या या लातूर जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्या जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जाहीर केल्या आहेत.

           स्थानिक सुट्या (मा.उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालयाखेरीज) लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील, असेही या अधिसुचनेत नमुद केले आहे.

 

 

                                                                          000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा