महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना”

 

हात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना

 

*लातूर,दि.25 (जिमाका):-* लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2022 अन्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजारांपर्यत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेस मान्यता दिलेली आहे.

नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार असुन या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

सदर योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे.योजना पुर्णत: ऑनलाईन पध्दतीने राबविली जाणार असून आधार क्रमांकानुसार यादया तयार करुन त्याचे लेखापरिक्षण करुन घेणार आहे.या  लेखापरिक्षण झालेल्या यादया महा-आयटीमार्फत विकसीत संगणकीय प्रणालीवर अपलोड करावयाच्या आहेत.

या योजने अंतर्गत ज्या पात्र शेतकऱ्यांची खाती आधार लिंक नसतील अशा शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर दि. 5 सप्टेंबर 2022 पूर्वी डकवण्यात येणार आहेत. योजनेतंर्गत लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

तरी ज्या शेतकऱ्यांची कर्ज खाती / बचतखाती आधार लिंक नसतील अशा शेतकऱ्यांनी त्यांची खाती आधार लिंक करुन घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                    000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा