वीर नायक मच्छिंद्रनाथ नामदेवराव चापोलकर यांना जानवळ येथे साश्रु नयनांनी अखेरचा निरोप, लातूर पोलिसांकडून मानवंदना
वीर नायक मच्छिंद्रनाथ
नामदेवराव चापोलकर यांना जानवळ येथे साश्रु नयनांनी अखेरचा निरोप, लातूर पोलिसांकडून
मानवंदना
लातूर दि. 21 ( जिमाका ) जानवळ येथील सुपुत्र
वीर जवान मच्छिंद्रनाथ नामदेवराव चापोलकर यांना
हजारो लोकांनी साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.यावेळी लातूर पोलिसांकडून मानवंदना
देण्यात आली.
यावेळी लातूरचे खा. सुधाकर श्रृंगारे, आ. बाबासाहेब
पाटील, मा. आ. विनायकराव पाटील,उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय पोलीस अधिकारी
( आय पी एस ) निकेतन कदम, चाकूर तहसीलदार शिवानंद बिडवे, सैनिक कल्याण कार्यालयाचे
एस व्ही. घोंगडे,शिरूर अनंतपाळचे गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण, गणेश हाके, शिवाजीराव
काळे, जि. प. सदस्य रोहित वाघमारे, जानवळचे सरपंच यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली
वाहिली.
19 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटल मध्ये Acute pancreatitis, pulmonary thromboembol
ism या मुळे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव न्यू दिल्ली येथून विमानाने हैद्राबाद येथे आणण्यात आले. तिथून रस्ता मार्गे जानवळ येथे आणले. आज हजारो लोकांनी पुष्पांजली अर्पण करून शेवटचा निरोप दिला. या सेवारत सैनिकास लातूर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.
Comments
Post a Comment