मुलगा हरवला आहे कोणाला काही माहिती असेल तर पोलीसांना कळविण्याचे आवाहन
मुलगा हरवला आहे
कोणाला काही माहिती असेल तर
पोलीसांना कळविण्याचे आवाहन
लातूर,दि.11(जिमाका)- किशन मोरप्पा मादळे वय 72 वर्षे व्यवसाय मजुरी
राहणार नावंदी ता. उदगीर जि. लातूर मो.नं. 8975279010 यांनी पोलीस स्टेशनला येवून
फिर्याद दिली. की फिर्यादी यांचा मुलगा व सुन मयत झाल्याने त्यांचे दोन्ही मुलं एक
शुभम वय 20 वर्ष व दुसरा सुमित वय 17 वर्ष फिर्यादी हेच सांभाळ करत असतात. यातील
सुमित हा मतिमंद असून तो दि. 17 जुलै 2022 रोजी 9 वाजता उदगीर येथे कामासाठी जातो
म्हणुन गावातील कृष्णा वाघमारे यांचे ॲटोत
बसून गेला. त्यानंतर ॲटोवाल्याकडे व नातेवाईकाकडे आज पावतो शोधाशोध केली परंतु आज
पावतो तो मिळून आला नाही. त्या संदर्भातील गुन्हा दाखल असून त्या बालकाचे वर्णन
पुढील प्रमाणे आहे.
नाव- सुमित धोंडिराम मादळे, उंची- 5 फुट 4 इंच
अंदाजे, रंग-सावळा, डोळे-मध्यम, केस-काळे व रंगवुन ब्राउन केलेले.पोशाख-
पँन्ट-शर्ट व इतर वर्णन एक समोरील वरच्या बाजुचा दात पडलेला असून मतिमंद आहे. असे
पोउपनि / पोस्टे वाढवणा मो.नं. 9767346418 यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment