धार्मिक अल्पसंख्यांक संस्थांच्या पायाभुत सोयी-सुविधा पुरविण्यासाठीच्या प्रस्तावाला मुदतवाढ

 

धार्मिक अल्पसंख्यांक संस्थांच्या पायाभुत सोयी-सुविधा

पुरविण्यासाठीच्या प्रस्तावाला मुदतवाढ

*लातूर,दि.12(जिमाका):*-राज्‍यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विदयार्थी बहुल शासन मान्‍य खाजगी अनुदानीत/विना अनुदानीत/कायम विना अनुदानीत शाळांना, कनिष्‍ठ महाविदयालय, औदयोगीक प्रशिक्षण संस्‍था नगरपालिका / नगरपरिषद    अपंग शाळांना पायाभुत सोयी-सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान योजना अल्‍पसंख्‍याक विकास विभाग शासन निर्णय क्रंमाक अविवि-२०१५/प्र.क्र.८०/१५/का-६/दिनांक ०७/१०/२०१५ अन्‍वये कार्यान्वित करण्‍यात आली आहे.

           सदर योजना सन २०२२-२३ मध्‍ये राबविण्‍याबाबत महाराष्‍ट्र शासन अल्‍पसंख्‍याक विकास विभाग, मुबंई यांचे पत्र क्रमांक अविवि-२०२२/प्र.क्र.४०/का-६/दिनांक १५ जून २०२२ अन्‍वये कळविण्‍यात आले आहे.

         धार्मिक अल्‍पसंख्‍याक विदयार्थी बहुल शासन मान्‍य खाजगी अनुदानीत / विना अनुदानीत / कायम विना अनुदानीत शाळांना, कनिष्‍ठ महाविदयालय, औदयोगीक प्रशिक्षण संस्‍था नगरपालिका / नगरपरिषद    अपंग शाळांना पायाभुत सोयी-सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान योजना सन २०२२-२३ साठी संस्‍थाचालकांनी / मुख्‍याध्‍यापकांनी  प्रस्‍ताव दिनांक ०७/१०/२०१५ च्‍या शासन निर्णयाप्रमाणे विहित नमुण्‍यात रितसर परिपूर्ण प्रस्‍ताव जिल्‍हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्‍हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर या कार्यालयात दिनांक ३१ ऑगस्‍ट २०२२ रोजी दुपारी ५.०० वाजे पर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्रस्‍ताव स्विकारले जाणार नाहीत यांची  कृपया नोंद घ्‍यावी. असे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                  000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु