नव संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी इच्छुक नागरीकांनी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत सहभाग नोंदवावा

 

नव संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी इच्छुक नागरीकांनी

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत सहभाग नोंदवावा

 

*लातूर,दि.25(जिमाका):-* लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा तालुकास्तरीय प्रचार-प्रसिध्दी शुभारंभ दिनांक 17 ऑगस्ट रोजी झाला असून या यात्रेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, नव उद्योजक व नागरीकांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.msins.in  वर नोंदणी करावी, तसेच जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती, लातूर यांनी केले आहे.

राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यतापूर्ण स्टार्ट अप धोरण 2018 जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्ट-अप्स परिसंस्थेच्या विकासाकरीता पोषक वातावरणनिर्मिती करुन त्यातून यशस्वी नवउद्योजक घडविण्याकरीता इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप विक यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

सन 2022-23 या वर्षात राज्यातील नागरिकांच्या नव संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी विभागामार्फत दि.15 ऑगस्ट, 2022 ते 2 ऑक्टोबर, 2022 या कालावधी दरम्यान महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.

         महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविण्यता यात्रेचे (स्टार्टअप यात्रा) ठळक वैशिष्ये पूढील प्रमाणे आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे, राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे व  महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण, कल्पना असणारे सर्व नागरिक या यात्रेत सहभागी होण्यास पात्र असतील.

          स्टार्टअप यात्रेचे प्रामुख्याने 3 टप्पे : तालुकास्तरीय प्रचार प्रसिध्दी व जनजागृती अभियान, जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र(Boot Camp and Pitching Session) राज्यस्तरीय अंतिम सादरीकरण सत्र व विजेत्यांची घोषणा(Final Pitching Session and Grand Final)

       जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर सादरीकरण सत्र(Boot Camp and Pitching Session) सर्व तालुक्यांत प्रचार प्रसिध्दी नंतर, जिल्हास्तरावर एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन केले जाईल. प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

या सादरीकरण सत्रामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय, कृषी, शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी, ऊर्जा, -प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधाआणि गतिशीलता, . अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी दिली जाईल. जिल्हयामधून पहिल्या तीन उत्कृष्ट सादरीकरणास अनुक्रमे रुपये 25 हजार  रुपये 15 हजार व रुपये 10 हजार पारितोषिक मिळणार आहे. तसेच सर्वोत्तम 10 (अव्वल 3 पकडून) सहभागींना राज्य स्तरावर सादरीकरणाची संधी भेटेल असे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र,लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                           0000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु