स्वराज्य महोत्सवाची लातूर जिल्ह्यात मोठी तयारी; ‘हर घर तिरंगा’ मोहिम गावोगावी तिरंगा झेंडा पोहचविण्यासाठी 2 लाख तिरंगा झेंडे रवाना
स्वराज्य महोत्सवाची लातूर जिल्ह्यात
मोठी तयारी;
‘हर घर तिरंगा’ मोहिम गावोगावी तिरंगा
झेंडा पोहचविण्यासाठी
2 लाख तिरंगा झेंडे रवाना
लातूर,दि.4(जिमाका):-लातूर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत स्वराज्य महोत्सवाचे आयोजन
करण्यात येत असून त्यांची मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. स्वराज्य महोत्सवातंर्गत
13 ते 15 ऑगस्ट पर्यंत ‘हर घर तिरंगा’ ही मोहिम असून जिल्हा परिषदेकडून तालुका पंचायत
समित्याकडे 2 लाख 6 हजार झेंडे पाठवून दिले असून उर्वरित झेंडे पाठविले जाणार असल्याची
माहिती जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी यांनी दिले.
दिनांक
8 ऑगस्टपासून जिल्ह्यात विविध कार्यक्रम सुरु हाणार आहेत. शाळा, महाविद्यालय, आरोग्य
विभागाच्या संबंधित ग्रामीण केंद्रापासून ते विविध विभागापर्यंत स्वराज्य महोत्सवाचे
विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत लावण्यासाठीचे झेंडे
गावागावापर्यंत पोहचविण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. पूर्व तयारी म्हणून गावागावात
प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तीपर माहितीपट दाखविण्यात येणार आहेत.
0000
Comments
Post a Comment