अनु. जाती च्या शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून तर अनु. जमातीच्या शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषि योजनेतून विहीरीचा लाभ घ्यावा

 

अनु. जाती च्या शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून तर अनु. जमातीच्या शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषि योजनेतून विहीरीचा लाभ घ्यावा

 

*लातूर,दि.2(जिमाका):-* अनु. जाती च्या शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृ‍षि क्रांती योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर आणि इतर बाबीसाठी किमान 0.20 हेक्टर जमिनीचे क्षेत्र व अनु.जाती, अनु. जमातीचे प्रमाण पत्र तसेच संबंधित शेतकऱ्यांचे 1 लाख 50 हजाराचे आत उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांनी नविन विहीर खोदकाम व बांधकाम करणे, जुनी विहीर दुरुसती करणे, विद्युत पंप संच, विजजोडणी, ठिबक सिचंन , तुषार संच इत्यादी बाबीसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन गटविकास अधिकारी तुकारामजी भालके व सहाय्यक गट विकास अधिकारी किरण कोळपे तसेच सर्व कृषि अधिकरी / विस्तार अधिकारी (कृषी) कृषी विभाग पंचायत समिती लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                   000

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा