*माझा मताधिकार गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा* *….चला तर मग..बाप्पाचं स्वागत आणि मताधिकाराचा जागर एकाच मखरात करु या….*

 

*माझा मताधिकार गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा*  

*….चला तर मग..बाप्पाचं स्वागत आणि मताधिकाराचा जागर एकाच मखरात करु या….*  

 

लातूर, दि. 12 (जिमाका): दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भारुन जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरु केलेली सार्वजनिक गणेशोत्वाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्षे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरित्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभाग होता येणार आहे.    

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळाच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. याच धर्तीवर माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफित हे साहित्य पाठवावयाचे आहे. मताधिकार हा 18 वर्षावरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांने आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडणे हे सुत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्याच्या माध्यमातून, तर घरगुती पातळीवर गणेश-मखराची सजावट, गेणश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे व इतर अमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयावर आपल्या देखाव्या सजावटीतून जागृती करता येऊ शकते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://ceo.maharashtra.gov.in आणि समाज माध्यमावर सदर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे. गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी दिनांक 31 ऑगस्ट, 2022 ते दिनांक 9 सप्टेंबर, 2022 या कालाधीत htpp://forms.gle./6jfuU4YSRZ6AU7  या गुगल अर्जावरील माहिती भरुन आपल्या देखावा-सजावटीचे साहित्य पाठवावयचे आहे.

या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डाची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या चार अर्हता तारखा यासाठी प्रसार - प्रचार केला जावा, आणि अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनीही केले आहे.

*वैयक्तिक (घरगुती गणेशोत्सव सजावट), सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे*

*अशा दोन्हींसाठी स्पर्धेचे नियम*

या स्पर्धा वैयक्तिक (घरगुती गणेशोत्सव सजावट) आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अशा दोन्हींसाठी आहे. सदर स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावेत.

 मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचे विविध कोनातून काढलेले पाच फोटो पाठवावेत. प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त पाच एमबी (५MB) साइजचा व  जेपीजी (JPG) फॉरमॅटमध्येच असावा. मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही याविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी. ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यावर स्पर्धकाचे नाव येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. चित्रफितीला आवाजाची जोड (व्हाइस -ओव्हर) देऊ शकता.ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त शंभर एमबी (१०० MB) असावी. तसेच ही ध्वनिचित्रफित एमपीफोर (mp4) फॉरमॅटमध्ये असावी आणि ती एक ते दोन मिनिटांची असावी.

*या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळाने साहित्य पाठवावे*

*दि. ३१ ऑगस्ट, २०२२ ते दि. ९ सप्टेंबर, २०२२ या कालावधीतील*

*साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य असणार*

मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या देखाव्याचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत. प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त पाच एमबी         (५ MB) साइजचा व जेपीजी (JPG) फॉरमॅटमध्येच असावा. आपल्या गणेशोत्सव मंडळामध्ये केलेल्या मताधिकार, लोकशाही याविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी. ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यावर मंडळाचे किंवा मंडळातील कुणा व्यक्तीचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त पाचशे एमबी (५०० MB) असावी. तसेच ही ध्वनिचित्रफीत एमपी फोर (mp4) फॉरमॅटमध्ये असावी आणि १० मिनिटांपेक्षा अधिक असू नये. गणेशोत्सव मंडळाने सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गूगल अर्जावर स्पर्धक म्हणून गणेशोत्सव मंडळाचे नाव लिहून, त्यानंतर डॅशचे चिन्ह (-) देऊन अध्यक्ष किंवा सचिव यांचे नाव लिहावे. उदा. घोलाईदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - मंदार मोरे) आणि पुढे त्याच व्यक्तीचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक लिहावा. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी असलेले पत्र गूगल अर्जावर जोडावे. या पत्राचा नमुना गूगल अर्जावर, जिथे हे पत्र जोडायचे आहे, तिथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

*स्पर्धकांनी आपले फोटो,ध्वनिचित्रफीत गूगल अर्जावरील माहिती भरून पाठवावी*

स्पर्धकांनी आपले फोटो आणि ध्वनिचित्रफीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.

*स्पर्धकांना फोटो किंवा ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण आल्यास*

*व्हॉट्सअॅपद्वारे क्रमांकाद्वारे मदत*

ज्या स्पर्धकांना फोटो किंवा ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी प्रणव सलगरकर ८६६९०५८३२५, तुषार पवार ९९८७९७५५५३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे. दिनांक ३१ ऑगस्ट, २०२२ ते  दिनांक ९ सप्टेंबर, २०२२ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

*सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरूप* 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल : प्रथम क्रमांक ५१ हजार रुपये , द्वितीय क्रमांक २१ हजार रुपये,  तृतीय क्रमांक ११ हजार रुपये, उत्तेजनार्थ ५ हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

*घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी बक्षिसांचे स्वरूप*

घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल : प्रथम क्रमांक ११ हजार रुपये,  द्वितीय क्रमांक ७ हजार रुपये,  तृतीय क्रमांक ५ हजार रुपये, उत्तेजनार्थ १ हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

*सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र*

सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. आलेल्या देखाव्या-सजावटींमधून सर्वोत्तम देखावे-सजावटी निवडण्याचा तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.

स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल. निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी / अधिकारी सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, त्यांच्या साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.

*या स्पर्धेत सहभागी होण्याबाबतचा विहीत नमुना*

*माझा गणेशोत्सव माझा मताधिकार*

*गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा 2022*    

मी श्री. / श्रीमती ………………………………………………………………………………………………………………………या गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष / सचिव असून आमचे मंडळ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित गणेशोत्सव देखावा - सजावट स्पर्धा -2022 मध्ये सहभागी हो आहे.   

 

दिनांक :                                                                                                            स्वाक्षरी /-

ठिकाण :                                                                                               अध्यक्ष / सचिव

 

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा