जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंक सोसायटीवर अशासकीय सदस्य नेमण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंक
सोसायटीवर अशासकीय सदस्य
नेमण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर,दि.10(जिमाका):- जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंक सोसायटीच्या लातूर व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय
सदस्यांची नेमणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिनांक 10 ऑगस्ट 2022 पासून ते दिनांक
19 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या बाबतचा अर्जाचा नमूणा पशुधन विकास
अधिकारी (वि) पंचायत समिती सर्व यांच्याकडे उपलब्ध् असून या क्षेत्रामध्ये काम केल्याचे
अनुभव प्रमाणपत्रासह अर्ज सादर करावेत.
जिल्हा प्राणि क्लेष प्रतिबंधक
सोसायटीच्या लातूरच्या व्यवस्थापकीय समितीवर पूढील प्रमाणे अशासकीय सदस्यांची नेमणूक
शासनामार्फत करावयाची आहे.संबंधित जिल्ह्यातील गोशाळा, पांजरपोळ संस्थापैकी एका संस्थेचा
अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थाचे दोन सदस्य, सर्वसाधारण
समितीने नामनिर्देशन केलेल्या दोन व्यक्ती व संबंधित जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य
करणारे, प्राणी कल्याणासाठी कार्य करणारे पाच ते सहा कार्यकर्ते असतील असे जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त तथा सदस्य सचिव प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती,लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
000
Comments
Post a Comment