लातूर जिल्ह्यात 1ते 10 सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत कोविड लसीकरण विशेष मोहिम, सर्व पात्र नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.*

 

लातूर जिल्ह्यात 1ते 10 सप्टेंबर या  गणेशोत्सव कालावधीत

कोविड लसीकरण विशेष मोहिम, सर्व पात्र नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा

                                                       -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.*

लातूर,दि.30(जिमाका)  गणेशोत्सव कालावधीत विशेष कोविड-19 लसीकरण मोहिमच्या निमित्ताने दिनांक 1 ते 10 सप्टेंबर या कालावधीत लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे, सर्व 12 वर्षावरील सर्व पात्र नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आवाहन केले आहे.

जिल्ह्यात गणेशोत्सव कालावधीत विशेष कोविड-19 लसीकरण मोहिम दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 10 सप्टेंबर, 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने या कालावधीत 12 वर्षावरील सर्व पात्र लाभार्थी यांना कोविड लसींचे डोस निशुल्क सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकिय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्रा.आ.केंद्र, उपकेंद्र व आवश्यकतेनुसार शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी दिले जाणार आहेत.

 गणेशोत्सव कालावधीत विशेष कोविड-19 लसीकरण मोहिमच्या निमित्ताने 12 वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना 1 सप्टेंबर 2022 ते 10 सप्टेंबर 2022  या कालावधीत लस मोफत दिली जाणार आहे. तरी लसीकरणासाठी पात्र असलेल्या लाभार्थींनी नजीकच्या शासकीय दवाखान्यात संपर्क साधुन कोविड लसीचे सर्व डोस घ्यावेत. लसीकरणास जाताना लाभार्थ्यांनी यापुर्वी कोविड लसीचा डोस घेताना वापरलेले ओळखपत्र सोबत घेऊन जावे.

   तरी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन स्वतःचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एल.एस.देशमुख व माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सतिष हरिदास यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा