लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील एकूण सात ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहिर

 

लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील

 एकूण सात ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहिर

 

*ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान दिवसापासून ते मतमोजणीच्या कालावधीपर्यंत मद्य विक्रीस मनाई*

           *लातूर,दि.2(जिमाका):-* मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र दिनांक 28 जून 2022 अन्वये लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील रामवाडी ख, रामवाडी पा, नरवटवाडी, पानगांव व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी, आनंदवाडी, तुरुकवाडी अशा एकूण 07 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी निवडणूक दिनांक 04 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दिनांक 05 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.

          सदर निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रीया संपण्याच्या वेळे पूर्वीच्या 48 तासांमध्ये मद्यविक्री करण्यासा मनाई / कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) नुसार तरतूद करण्यात आली आहे.याशिवाय मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे बंधन आहे.

          पूढील नमूद नियमावली अंतर्गत मद्य विक्री निवडणूक मतदान प्रक्रिये दरम्यान बंद करणे बाबत देखील तरतूद आहे. महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवहया इत्यादी.) नियम 1969, महाराष्ट्र देशी दारु नियम 1943, विशेष परवाने व अनुज्ञप्ती  नियम 1952, ताडी दुकाने (अनुज्ञप्ती)आणि ताडी झाडे (छेदणे)1968.

          मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या नमूद निदेशान्वये तसेच उक्त नियमातील अंतर्गत मला प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर जिल्ह्यातील पूढील नमूद केलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील खाली नमुद अनुज्ञप्ती अंतर्गत मद्य विक्रीचे व्यवहार पूर्णतया बंद ठेवण्याबाबत आदेशित केले आहे.

          दिनांक 02 ऑगस्ट 2022 रोजी मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर सायं. 5.30 वाजेपासून बंद क्षेत्र लातूर जिल्ह्यातील तालुक्यातील रामवाडी ख, रामवाडी पा, नरवटवाडी, पानगांव व शिरु अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी, आनंदवाडी, तरुकवाडी ग्रामपंचायत हद्द.

          दि. 03 ऑगस्ट 2022 रोजी मतदानाच्या पुर्वीचा दिवस पुर्ण दिवस बंद, दि. 04 ऑगस्ट 2022 रोजी मतदानाचा दिवस सायं. मतदान प्रक्रीया संपेपर्यंत, दि. 05 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणीचा दिवस, बंद कालावधी मतमोजणी कार्यक्रम संपेपर्यंत राहील.

          उक्त नमूद केल्याप्रमाणे आदेशति करण्यात आलेल्या बंद कालावधीत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील रामवाडी ख, रामवाडी पा, नरवटवाडी, पानगांव व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी, आनंदवाडी, तुरुकवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ज्या अनुज्ञप्ती आदेशाचे उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येईल अशा संबंधीत अनुज्ञप्तीधारकांची ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती करयमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याशिवाय महाराष्ट्र दारु बंदी कायदा 1949 अंतर्गत नमूद तरतुदीन्वये संबंधीत अनुज्ञप्तीधारकांवर फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल याची गंभीरपणे नोंद घ्यावी असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

 

                                                       000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु