कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल पंप, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर देण्यासाठी सोडत
कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल पंप, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन
टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर देण्यासाठी सोडत
लातूर,
दि.10(जिमाका): जिल्ह्यतील
सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, जिल्हा परिषद
लातूर सेस फंडातून कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल
पंप, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकण यंत्र 50
टक्के अनुदानावर DBT तत्वावर देण्यासाठी ईच्छूक
शेतक-याकडून पंचायत समिती स्तरावर अर्ज मागविण्यात आले होते.
सदर सर्व औजारासाठी सोडत पध्दतीने
लाभार्थ्याची निवड संबंधीत पंचायत समिती स्तरावर शेतक-यांच्या उपस्थितीत करण्यात
येणार आहे.
तरी अर्जदार शेतक-यानी 18 ऑगस्ट 2022
रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता आपल्या पंचायत समितीच्या सभागृहात उपस्थित राहावे
असे अवाहन कृषि विकास अधिकारी व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
000
Comments
Post a Comment