मतदार यादी बरोबर आधार लिंक सुविधा उपलब्ध, मतदारांनी सुविधेचा वापर करुन नांव नोंदविण्याचे आवाहन
मतदार यादी बरोबर
आधार लिंक सुविधा उपलब्ध,*
*मतदारांनी सुविधेचा
वापर करुन नांव नोंदविण्याचे आवाहन*
*लातूर,दि.2(जिमाका):-*
निवडणूक
आयोगाकडून कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियमात सुधारणा
करण्यात आले असून कलम 23 नुसार मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणिकरणासाठी
ऐच्छीकपणे ‘आधार’ ची माहिती संग्रहीत करण्याच्या सुधारणा अंतर्भूत केल्या आहेत यासाठी
लातूर तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की मतदारांनी ऑनलाईन पध्दतीने
आधार क्रमांक भरण्यासाठी ओटर हेल्पलाईन ॲप व www.nvsp.in या माध्यमात
सुविधा उपलब्ध् करुन देण्यात आली आहे.
त्यानुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणिकरणासाठी
मतदाराकडुन ऐच्छिकपणे आधारची माहिती संकलीत करण्यासाठी मतदार नोंदणी नियम 1960
मधिल नियम 26ब मध्ये नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आलेला आहे. सदर अर्ज क्र.
6ब मा. भारत निवडणूक आयोग यांचे व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच मतदारांना
ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी voterhelpline App व www.nvsp.in या माध्यमावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असुन त्याची सुरवात दि.1
ऑगस्ट 2022 पासुन करण्यात आलेली आहे.
त्यानुसार
लातूर तालुक्यातील सर्व मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी
जोडण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने voterhelpline App गुगल प्ले
स्टोअर मधुन डाऊनलोड करुन सदर मोबाईल अॅप व्दारे अर्ज करता येईल. तसेच आपण आपले
यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांचेशी
संपर्क साधुन सुध्दा आपले आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडु शकता येईल.
असे अवाहन उपविभागीय अधिकारी, तथा मतदार नोंदणी अधिकारी
सुनिल यादव, तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी, स्वप्नील पवार व नायब तहसिलदार निवडणूक लातूर कुलदिप देशमुख यांनी
केलेले आहे.
Comments
Post a Comment