स्टॅडअप इंडिया योजनेतंर्गत भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गाला मार्जिन मनी योजना सुरु

 

स्टॅडअप इंडिया योजनेतंर्गत भटक्या जमाती

                                   ‘क’ प्रवर्गाला मार्जिन मनी योजना सुरु

 

        *लातूर,दि.2(जिमाका):-* इतर मागास बहुजन कल्याण शासन निर्णय क्रमांक सीबसी-2019/प्रक्र-127/मावक दि.06/09/2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टॅडअप इंडिया योजनेतंर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणेबाबतची योजना सुरु करण्यात आलेली आहे.

          सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचना शासन  निर्णय क्रमांक स्टॅडई-2020/प्रक्र23/अजाक दिनांक 9/12/2020 अन्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेले आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या WWW.Maharashtra.gov.in या संकेत स्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

             सदर योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यानी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर यांचेकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूतता करून प्रस्ताव दिनांक 06 सप्टेंबर 2022 पूर्वी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय लातूर यांचे कार्यालयात सादर करावे असे आवाहन  सहायक आयुक्त समाज कल्याण एस.एन. चिकुर्ते यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

 

                                           000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु