स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

 

भारत आता जागतिक पातळीवर खेळात चमकतो आहे;

लातूरमध्येही मोठी गुणवत्ता आहे, अधिक दर्जेदार खळाडू घडवू या..!!     

-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन

 

§  लातूर शहरातील, जिल्ह्यातील खेळाडू, नागरिक व कर्मचारी यांनी मॅरेथॉन स्पर्धेत नोंदविला सहभाग

§  जिल्ह्यातील प्रत्येकांनी आप-आपल्या घराच्या छतावर,दर्शनी भागात तिरंगा सन्मानाने फडकवावा

लातूर,दि.13(जिमाका)-  देशाला स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यानिमितान जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा कार्यालयातंर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यातंर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात 13, 14, 15 ऑगस्ट, 2022 हे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील सर्वात मोठा कार्यक्रम हर घर झेंडा उपक्रम आहे. आपआपल्या घराच्या छतावर दर्शनी भागात लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी तिरंगा फडकविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी केले. या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन लातूर आसौ रोडवरील जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, -क्रिडा अधिकारी मदनलाल गायकवाड, कृष्णा केंद्रे, ब्रम्हकुमारीजचे पदाधिकारी, आदिंची यावेळी उपस्थिती होती.

या मॅरेथॉन स्पर्धेची सुरूवात जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथून सकाळी ठिक 6-30 वाजता सुरू झाली. यात 14 वर्षाखालील मुले / मुली यांचा गट 3 कि.मी., 17 वर्षाखालील मुले / मुली 5 कि.मी व त्यापुढील वयाचा खुला गट 10 कि.मी. ठेवण्यात आलेला होता. या मॅरेथॉनमध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल व प्रशस्तीपत्रक बहाल करण्यात आले. स्पर्धेचा मार्ग उपस्थित ठिकाणी सांगण्यात आला. यावेळी जिम्नॅस्टीक, एरोबिक्स यांचे प्रात्याक्षिक जिल्हा क्रीडा संकुल येथे दाखविण्यात आले.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. बोलतांना म्हणाले की, जेंव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, तेंव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र झाले होते, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. त्यावेळी भारतातून पाकिस्तानात, तर पाकिस्तानातून भारतात अशा प्रकारे नागरिकांनी स्थलांतर झाले. यामध्ये अनेक भारतीयांना यात प्राणही गमवावे लागले आहेत. त्या स्मृती प्रित्यर्थ आपण उद्या तो संवेदना दिवस पाळणार आहोत.

आजच्या मॅरोथॉन स्पर्धेचे आयोजन म्हणजे,

बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे यांना प्रोत्साहन

भारतामध्ये एथलॅक्टिस या खेळामध्ये प्रगती होत असतांना दिसून येत आहे, बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे हे केवळ 0.5 सकेंदाने पहिल्या क्रमांकावरुन गेले असून त्यांचा दुसरा क्रमांक आला आहे. अशा मॅरेथॉनमधून उद्याचे साबळे यांच्यासारखे देशाचे नाव उचावणारे खेळाडू घडावेत. त्यासाठी अशा मॅरेथॉन घेणे महत्वाच्या आहेत, अशी भावना जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-2022 अंतर्गत

घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल

खुला गट (पुरुष) :- प्रथम मोमले छगन मेडल व प्रमाणपत्र रुपये 3 हजार, द्वितीय लव्हाळे विष्णू मेडल व प्रमाणपत्र रुपये 2 हजार, तृतीय सचिन पवार मेडल व प्रमाणपत्र रुपये 1 हजार.

खुला गट (महिला) :- प्रथम साबिया पटेल मेडल व प्रमाणपत्र रुपये 3 हजार, द्वितीय लक्ष्मी गुंजाळ मेडल व प्रमाणपत्र रुपये 2 हजार, तृतीय राठोड पुष्पा मेडल व प्रमाणपत्र रुपये 1 हजार.

14 वर्षाखालील मुले :- प्रथम रितेश भालेराव मेडल व प्रमाणपत्र रुपये 3 हजार, द्वितीय रोहन भालेराव मेडल व प्रमाणपत्र रुपये 2 हजार, तृतीय कपिल रामेगावे मेडल व प्रमाणपत्र रुपये 1 हजार.

14 वर्षाखालील मुली :- प्रथम राजनंदिनी मेडल व प्रमाणपत्र रुपये 3 हजार, द्वितीय समीक्षा देवणे मेडल व प्रमाणपत्र रुपये 2 हजार, तृतीय श्रावणी राऊतराव मेडल व प्रमाणपत्र रुपये 1 हजार.

17 वर्षाखालील मुले :- प्रथम आसिफ पठाण मेडल व प्रमाणपत्र रुपये 3 हजार, द्वितीय ओम कन्हेरकर मेडल व प्रमाणपत्र रुपये 2 हजार, तृतीय गोविंद सोळंकी मेडल व प्रमाणपत्र रुपये 1 हजार.

17 वर्षाखालील मुली :- प्रथम शिंदे रुपाली मेडल व प्रमाणपत्र रुपये 3 हजार, द्वितीय श्वेता काळे मेडल व प्रमाणपत्र रुपये 2 हजार, तृतीय श्रावणी जगताप मेडल व प्रमाणपत्र रुपये 1 हजार.

 

फाळणी अत्याचार स्मृती दिनानिमित्तच्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनास भेट द्यावी

त्यानिमित्त 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10-00 वाजल्यापासून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्या मजल्यावर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे, लातूरकरांनी या प्रदर्शनास भेट देण्याचीही आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. 

तसेच 15 ऑगस्ट रोजी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे सकाळी 9-05 वाजता जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. त्यासाठीही उपस्थित राहावे व आपला सहभाग नोंदवावा, असेही सांगितले.

****




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु