विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सैनिक पाल्यांना एकरकमी रुपये 10 हजार व रुपये 25 हजार विशेष गौरव पुरस्कार
विविध क्षेत्रात
अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सैनिक पाल्यांना एकरकमी रुपये 10 हजार व रुपये 25 हजार
विशेष गौरव पुरस्कार
*लातूर,दि.26(जिमाका)-* लातूर जिल्ह्यातील
माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय / आंतर राष्ट्रीय पातळीवर
खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, इत्यादी क्षेत्रातील
पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट
कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी
करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्यांना
त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी एकरकमी रुपये 10 हजार व आंतर राष्ट्रीय स्तरासाठी
रुपये 25 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्या बाबत सैनिक कल्याण विभाग, पुणे यांनी कळविले
आहे.
तसेच ज्या माजी सैनिक, विधवांचे पाल्य
इयत्ता दहावी व बारावी मंडळाच्या परिक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवुण उत्तीर्ण
झाले आहेत. त्यांनी पण गौरव पुरस्कारासाठी अर्ज दिनांक 15 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे करावेत. गौरव पुरस्काराचे अर्ज सैनिक कल्याण विभाग,
पुणे यांचेकडे दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावयाचे आहेत,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी
तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले
आहे.
0000
Comments
Post a Comment