प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत "कृषि प्रक्रिया जागृती पंधरवाडा"
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत
"कृषि प्रक्रिया जागृती पंधरवाडा"
*लातूर,दि.12(जिमाका):-*प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) अंतर्गत जिल्हा कृषि विभागातर्फे 15 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत कृषि प्रक्रिया जागृती पंधरवाडयाचे आयोजन केले आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी हा पंधरवाडा असेल. या उपक्रमात उद्योग उभारणी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नोंदणी आणि प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील.
केंद्रशासनाने प्रधामंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना देशभरात राबविण्याचे नियोजन केले आहे. ही योजना 2020 ते 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविली जाणार आहे. यामध्ये नवीन स्थापित होणारे वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट यांची पत मर्यादा वाढविणे, उत्पादनांचे विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघंटीत पुरवठा साखळीशी जाडणे ही या योजनेची मुख्य उद्यिष्टये आहेत.
या योजने मार्फत नव उद्योजकांना नविन प्रक्रिया उद्योग जसे बेकरी व कन्फेक्शरी स्नॅक्स, लोणची, पापड, तेलघाना, गुळ उद्योग, डेअरी प्रॉडक्ट, दाळमिल,मसाले "Ready to It and Ready to Cook" या सारखे अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी आणि कार्यरत उद्योगांचे विस्तारीकरण करण्यासाठी योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेत कृषि सहाय्यका मार्फत योजनेची माहिती देवून अर्ज भरुन घेण्यात येणार आहे.
तसेच 16 ऑगस्ट रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून बँकेला कर्ज मंजूरीसाठी लागणाऱ्या अतिरीक्त कागदपंत्राची लाभार्थ्यास माहिती देवून त्याची पुर्तता करण्यात येणार आहे. तर 17 ते 27 ऑगस्ट 2022 दरम्यान प्राप्त अर्जातील इच्छुक लाभार्थींचे जिल्हा संसाधन व्यक्ती मार्फत प्रकल्प अराखडे तयार करुन, जिल्हास्तरावर त्यांची तपासणी करुन संबंधीत आराखडे संबंधीत लाभार्थ्यांच्या बँकेत सादर करण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर कार्यालयातील बालकुंदे
व्ही.एम. मो.नं. 9823238338 व जिल्हा संसाधन व्यक्ती 9657087562 / 8275542077 यांच्याशी
संपर्क साधावे असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment