गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी विधी अधिकारी नेमणुकीसाठी अर्ज मागवले

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी विधी अधिकारी नेमणुकीसाठी अर्ज मागवले लातूर, दि. १७ : शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (खंडित कालावधी) व सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत न्यायालयीन प्रकरणांच्या कामकाजासाठी विधीज्ञ तथा विधी अधिकारी नेमण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच किंवा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात वकिलीचा किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. महाराष्ट्र/गोवा बार कौन्सिलच्या दरपत्रकानुसार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचमधील प्रति केससाठी १० हजार रुपये आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातील प्रति केससाठी ५० हजार रुपये मानधन दिले जाईल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज djdalatur@rediffmail.com या ई-मेल आयडीवर २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पाठवावेत, असे लातूर विभागीय कृषी सहसंचालक, लातूर विभाग लातूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत