भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित लातूर, दि ११ (जिमाका) : भूकंपासारख्या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी करावयाच्या उपाययोजनांची रंगीत तालीम मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे. भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीत कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा, काय करावे व काय करू नये, याबाबतची माहिती एनडीआरएफ पथकामार्फत यावेळी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शोध व बचाव पथके यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबींची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. **

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित