मेस्को लातूर अंतर्गत सुरक्षा रक्षकांच्या अनेक रिक्त जागा; माजी सैनिक, पाल्य, पत्नी व विधवांनी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

मेस्को लातूर अंतर्गत सुरक्षा रक्षकांच्या अनेक रिक्त जागा; माजी सैनिक, पाल्य, पत्नी व विधवांनी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत लातूर, दि. १७ : माजी सैनिक सहाय्यक योजना अंतर्गत मेस्कोच्या लातूर क्षेत्रीय कार्यालय येथे बीड आणि नांदेड जिल्ह्यांतील विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक पदांच्या रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी माजी सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य, माजी सैनिकांच्या पत्नी तसेच माजी सैनिकांच्या विधवा यांना प्राधान्याने संधी देण्यात येत आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज, सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मेस्को क्षेत्रीय कार्यालय, लातूर येथे स्वतः जाऊन कागदपत्रे जमा करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित