जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बुधवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक मार्गदर्शन

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात बुधवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक मार्गदर्शन लातूर दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक विधवा व त्यांचे अवलंबित यांच्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर हे यावेळी महसूल विषयक, कौटुंबिक वादविवाद संदर्भातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी, त्यावर योग्य ते कायदेविषयक मार्गदर्शन व आवश्यक ती मदत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी लातूर जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, विधवा व त्यांचे अवलंबित यांनी लातूर जिल्हा सैनिक कार्यालय येथे आवश्यक त्या कागदपत्रासोबत उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत