‘एमएसआरटीसी’च्या बस प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड योजना सुरू

‘एमएसआरटीसी’च्या बस प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड योजना सुरू लातूर, दि. १७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) ने प्रवाशांना सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 'रुपे ऑन द गो, एनसीएमसी इनेबल्ड' कार्ड योजना राज्यभरात कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. या कार्डद्वारे सवलतधारक (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला इ.), विनासवलत प्रवासी आणि सामान्य प्रवासी यांना एकाच कार्डमध्ये प्रवास पास, ऑनलाइन वॉलेट आणि ऑफलाइन वॉलेट उपलब्ध होणार आहे. हे कार्ड वैयक्तिक स्वरूपाचे असून त्यावर व्यक्तीचे नाव आणि फोटोसह माहिती अंकित असेल. हे कार्ड अहस्तांतरणीय असून सवलतीच्या तिकीटासाठी अनिवार्य राहणार आहे. कार्डची नोंदणी आणि वितरण एमएसआरटीसीच्या २५१ आगारातील अधिकृत एजंट, ३३५ वाहतूक नियंत्रण कक्ष तसेच एनएसडीएल पेमेंट बँकेद्वारे नियुक्त होणाऱ्या ३००० पेक्षा अधिक अधिकृत एजंट यांच्यामार्फत होईल. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून नोंदणी पूर्ण झाल्यानंतर साधारण ३० दिवसांत कार्ड वितरित केले जाईल. कार्ड मिळाल्यानंतर पीओएस यंत्राद्वारे सक्रियकरण करावे लागेल. सवलतधारक प्रवाशांना (विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक इ.) या कार्डचा लाभ मिळेल. प्रवासादरम्यान घेतलेले तिकीट सांभाळणे ही प्रवाशांची जबाबदारी राहील. राज्य परिवहन महामंडळाने या डिजिटल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन लातूर विभाग नियंत्रक यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत