लातूर विमानतळावर सुरक्षा विषयक उपाययोजनांना प्राधान्य द्या- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले • एमएडीसी, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी

लातूर विमानतळावर सुरक्षा विषयक उपाययोजनांना प्राधान्य द्या- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले • एमएडीसी, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी • सुरक्षा भिंत बांधताना शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता देण्याच्या सूचना लातूर, दि. ११ : येथील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विमानतळाला संयुक्त भेट देवून पाहणी करावी. त्यानुसार कालबद्ध उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विमानतळविषयक बैठकीत ते बोलत होते. आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर विमानतळाचे व्यवस्थापक राजेश जीवन यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होतेतसे. तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राजकुमार बॅरी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. विमानतळाच्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. येथील पांदन रस्त्याऐवजी शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक बाबी लक्षात घेवून आवश्यक कार्यवाही करावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून याबाबत माहिती द्यावी. शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये, याची काळजी घ्यावी, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. बॅरी यांनी विमानतळावर प्रस्तावित करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. तसेच लवकरच लातूर विमानतळाची संयुक्त पाहणी करण्यात येईल, असे सांगितले. *****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित