सैनिक कल्याण विभागात ७२ लिपिक-टंकलेखक पदांसाठी १४ मार्चला ऑनलाईन परीक्षा
सैनिक कल्याण विभागात ७२ लिपिक-टंकलेखक पदांसाठी
१४ मार्चला ऑनलाईन परीक्षा
लातूर, दि. १७ : सैनिक कल्याण विभाग आणि त्याअंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत गट-क संवर्गातील लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण ७२ रिक्त जागांसाठी टीसीएस-आयओएनमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा १४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत घेतली जाईल. या पदांसाठी अर्ज केलेल्या लातूर जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी वरील नमूद वेळेत परीक्षेसाठी उपस्थित राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.
Comments
Post a Comment