इयत्ता दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाकडून उपाययोजना

इयत्ता दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाकडून उपाययोजना लातूर, दि. १९ : जिल्ह्यात आजपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेस प्रारंभ होत असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर अचानकपणे भेट देण्यासाठी भरारी पथकाची व कायमस्वरूपी बैठे पथकाची व्यवस्था करण्यात आली असून, कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक दक्षता घेतली आहे. जिल्ह्यातील १५२ परीक्षा केंद्रावर २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या काळात इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे. लातूर जिल्ह्यातून ३९ हजार २४२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रत्येक विषयाच्या पेपरसाठी १५२ केंद्रासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि इतर विभागांच्या समन्वयातून १५२ त्रिसदस्यीय बैठी पथके गठीत करण्यात आली आहेत, ती रोटेशन पद्धतीने कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. ही पथके पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मागर्दर्शनाखाली तयार करण्यात आलेली महसूल अधिकारी, जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुख यांची 70 भरारी पथके परीक्षा कालावधीत विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेट देवून पाहणी करतील. परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत