पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम लातूर दि. १० (जिमाका) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. पालकमंत्री श्री. भोसले यांच्या उपस्थितीत बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लातूर जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल. त्यांतर दुपारी १ वाजता ते लातूर विमानतळाच्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. दुपारी २ ते २.५० वाजेपर्यंत राखीव. दुपारी ३ वाजता लातूर एमआयडीसी येथील विवेकानंद कॅन्सर अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला पालकमंत्री श्री. भोसले भेट देतील. दुपारी ३.३० वाजता लातूर येथून औसाकडे प्रयाण करतील. दुपारी ४ वाजता औसा येथील आझाद चौक येथे भाजपाचे वसीम खोजन यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर औसा येथून साताराकडे प्रयाण करतील. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत